रविवारी संध्याकाळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील गल कलान गावात लाला लजपत राय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या कॅम्पसमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या गटाची बिहार आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांशी बाचाबाच झाली. या घटनेत दोन्ही बाजूचे काही विद्यार्थी जखमी झाले असुन, मिडिया रिपोर्ट नुसार, टी-20 क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला.
जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 9 जणांना आपत्कालीन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तथापि, रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सुखप्रीत सिंग ब्रार म्हणाले, “कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
स्टेशन प्रभारी जसविंदर सिंह म्हणाले, 'लाला लजपत राय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकांशी भिडले. दोघेही एकमेकांवर दगडफेक करताना दिसले. घोषणाबाजीची माहिती नाही. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर ही हाणामारी झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बहुतेक काश्मिरी विद्यार्थी एका विशिष्ट समुदायाचे होते. ते पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचा आरोप आहे. बिहार आणि इतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने कथितरित्या पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर दोन गटात बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेकही केली. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. कॉलेज कॅम्पस आणि वसतिगृह परिसरात तत्काळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा