मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनावर न्यायालय उद्या निर्णय देणार

 


200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी आज दिल्लीच्या विशेष न्यायालयात जॅकलिन फर्नांडिसची सुनावणी होणार होती. जॅकलिनच्या जामिनावर आज निर्णय होणार होता. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतर दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी आता उद्या निकाल सुनावणार आहे. 

एका वृत्तपत्राशी बोलताना जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, 'ईडीची तक्रार दाखल झाल्यानंतर जॅकलिनला दिल्ली कोर्टात हजर राहावे लागले. कोर्टाने जॅकलिनला हजर राहण्याच्या पहिल्या तारखेला अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याचवेळी अभिनेत्रीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. ईडीने जामीन अर्जाला विरोध केला होता. यानंतर आम्ही जामिनासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता उद्या निकाल सुनावण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टात ईडी आणि जॅकलिनच्या वतीने बरीच चर्चा झाली आहे. एकीकडे जॅकलीन सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे, तर दुसरीकडे जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, तिने पाच वेळा तिचे म्हणणे नोंदवले आहे. दुसरीकडे, सुकेशकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंबाबत अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले की, सेलिब्रिटींना अनेकदा भेटवस्तू मिळतात, अशा परिस्थितीत ते कोणी आणि कोणत्या पैशाने दिले, याबद्दल पूर्ण माहिती नसते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने