ऊर्जा क्षेत्राच्या कोळसा पुरवठ्यावर नियमितपणे देखरेख, कोळसा मंत्रालयाची माहिती

 


कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ऊर्जा क्षेत्राला केल्या जाणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यावर मंत्रालयाद्वारे ऊर्जा आणि रेल्वे मंत्रालयांच्या निकटच्या समन्वयाने नियमितपणे देखरेख ठेवली जात आहे.  या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून कोळशावर आधारित देशांतर्गत ऊर्जा प्रकल्पांमधील कोळशाचा अंतीम साठा, यंदाच्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी 25.6 दशलक्ष टन इतका होता, जो 2020-21 हे कोविडचे वर्ष वगळता, ऑक्टोबर महिन्यातील सर्वात जास्त साठा होता. वीज क्षेत्राचा देशांतर्गत कोळसा पुरवठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 12% अधिक आहे जो कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत वीज क्षेत्राला झालेला सर्वाधिक पुरवठा आहे. 

कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टाने, कोळसा मंत्रालयाने अलीकडेच 141 नवीन कोळसा खाणी व्यावसायिक लिलावासाठी खुल्या केल्या. याआधी लिलाव केलेल्या खाणी जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी मंत्रालय, राज्य सरकारे आणि संबंधित केंद्रीय मंत्रालयांशी समन्वय साधत आहे. कोळशाचे जलद बहिर्गमन सुनिश्चित करण्यासाठी पीएम-गतीशक्ती योजने अंतर्गत सर्व प्रमुख खाणींच्या रेल्वे संपर्क पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मंत्रालय पावले उचलत आहे. तसेच ऊर्जा क्षेत्राला कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने