राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा ट्विटर द्वारे केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवर लिहले आहे 'पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत ' अशी भावना व्यक्त करून आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे त्यांनी म्हंटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांचं ट्विट पाहून मलाही धक्का बसला आहे. अशा पद्धतीने त्यांच्यावर खोटे आरोप करून सरकार त्यांना जेरबंद करू इच्छित आहे. आपल्या महाराष्ट्रात सरकारकडून अशी कारवाई होणं हे दुर्दैवी आहे. आव्हाडांसारखा विधानसभेचा सदस्य आणि मंत्री राहिलीली व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर असं कोणतंही कृत्य करू शकणार नाही. तरी त्यांच्यावर आरोप करणं आणि त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं, यातून आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रात अशी पद्धत यापूर्वी नव्हती.
दुर्दैवाने गेल्या काही तासांत सतत कारवाया होत आहे. आव्हाडा यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. हे सरकार किती खूनशी प्रवृत्तीने काम करतंय. एखाद्या विरोधात काम करायचं म्हटल्यावर व्यक्तीगत जीवनात किंवा व्यक्तीगत स्तरावर जाऊन निंदा नालस्ती करण्याची व्यवस्था होतेय. आश्चर्य याचे वाटतंय आपल्या महाराष्ट्रात असं घडणं चुकीचं आहे. जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना हे कळत नाही का? सरकार येतात आणि जातात त्यांना आपल्याला रितसर नियमाने नोकरी करायची, हे समजलं पाहिजे. वरून कोणीतरी सांगतय आणि म्हणून पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत त्यात उद्या कोणत्या प्रकारची वागणूक नवं सरकार आल्यावर देईल याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. हा सगळाच प्रकार दुर्दैवी आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड खरंच राजीनामा देणार का कि हा पण सहानभूती मिळवण्यासाठी स्टंट आहे अश्या चर्चा सोशल मीडियावर जोर पकडत आहे.
टिप्पणी पोस्ट करा