ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहीत नाही त्यांनी काहीच बोलू नये : मंत्री दानवे

 


ब्युरो टीम : ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहित नाही त्यांनी टीकाच करू नये असं मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. स्वातंत्र्यवीर ,सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये विचारले असता दानवे म्हणाले ,ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान माहीत नाही, ज्यांना  त्यांचे योगदान माहित नाही अशांनी त्यावर बोलू नये हे आमचे मत आहे, त्यांनी कोणत्याच प्रकारची टिप्पणी सुद्धा करू नये असेही दानवे यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली जर त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर त्यांना शिक्षा झाली पण नसती, त्यामुळे उगाच काही बोलून बोलू नये असे ते म्हणाले.

स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी त्यांना मानणारे सर्वच जण जातात, त्याप्रमाणे यावर्षी स्मृतिदिनी अनेक जण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी गेले, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील स्मृतीस्थळी अभिवादनासाठी गेले होते मात्र त्यानंतर काहीजणांनी या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणाचा प्रयत्न केला स्वर्गीय ठाकरे यांच्या संपत्तीचे  वारस असतील दुसरीकडे शिवसेना प्रमुखांचे विचार सुद्धा हे महत्त्वाचे आहे त्या विचाराचे वारसदार कुणीही होऊ शकतो असे सांगत शिवसेना प्रमुखांना  ज्या काँग्रेसने  शिव्या शाप दिले त्याच पक्षांच्या बरोबर शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराशी प्रतारणा करीत युती करणारे जे कोणी आहेत त्यांच्यावरच खऱ्या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली .

नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे आष्टी पर्यंतचे 60 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, या मार्गावर प्रायोगिक स्वरूपात एक फेरी रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे, सध्या या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे, मात्र तयार करण्यात आलेला रेल्वे मार्ग यथासित राहण्यासाठी ही फेरी सुरू करण्यात आली आहे, आगामी काळात आष्टी वरून नगरला येणारी गाडी पुण्यापर्यंत कनेक्ट करण्याचा विचार आहे आता दुसरी फेरी संध्याकाळच्या वेळेस याच मार्गावर सुरू होत असल्याचा निर्वाळा देखील रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने