फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्र्यांची आयएनएस विक्रांतला भेट

 


फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे मंत्री  सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस (INS) विक्रांतला भेट दिली.  या प्रतिनिधीमंडळाने दक्षिणी नौदल  कमांड  फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ॲडमिरल एमए हम्पीहोली यांच्याशी विक्रांत जहाजावर संवाद साधला. फ्रान्सच्या मंत्र्यांनी भारताची स्वदेशी निर्मितीची क्षमता आणि आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली.  

यावेळी परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यापासून ते हिंद महासागर क्षेत्रामधली आव्हाने यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हायला मदत मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने