शिवसेना (उ.बा.ठा.) नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

 


पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रवीण राऊतलाही पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 102 दिवसांनंतर आज संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. मुंबईतील गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

कोर्टाने आदेश देताच शिवसेना खासदाराच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी कोर्टरूममध्ये आणि कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये टाळ्या वाजवल्या. दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला अल्प कालावधीसाठी स्थगिती देण्याची मागणी केली होती जेणेकरून ईडी मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू शकेल. संजय राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या मागणीवर मुंबईचे पीएमएलए न्यायालयाने हि मागणी फेटाळली व संजय राऊत यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. 

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळच्या पुनर्विकासाच्या प्रकरणात मध्यस्थ प्रवीण राऊत याच्या मार्फत बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप या शिवसेना  नेत्यावर आहे. त्या पैशातून संजय राऊत यांनी दादर आणि अलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही देखील आहे. संजय राऊत 1 ऑगस्टपासून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंद आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक हेही या कारागृहात आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊत यांना मिळालेला जमीन हा शिवसेना (उ.बा.ठा.) यांच्यासाठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे आक्रमक प्रवक्ते असून त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांची चांगली पकड आहे असे मानले जाते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने