इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेतर्फे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा ग्राहकांच्या दारी

 


आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बँक बँकिंगशी संबंधित इतर सर्व सुविधांसह निवृत्तीवेतन धारकांच्या सोयीसाठी जीवन प्रमाण सेवा पुरवत आहे. 

निवृत्तीवेतन सुरळीतपणे मिळण्यासाठी आवश्यक असलेली जीवन प्रमाण सेवा म्हणजेच डिजिटल स्वरूपातील हयातीचा दाखला निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य व्हावे यासाठी आयपीपीबीने केंद्रीय निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाच्या सहकार्याने नवा उपक्रम हाती घेतला आहे. 

आधार क्रमांकाच्या मदतीने बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित असलेली ही सेवा वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत सोयीची आहे. आतापर्यंत देशातील 11 लाख निवृत्तीवेतन धारकांनी जीविताचा दाखला सादर करण्यासाठी आयपीपीबीच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळण्याच्या सेवेचा लाभ घेतला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने