इंटेलिजन्स ब्युरोचे सेवानिवृत्त अधिकारी यांची अज्ञात कारने चिरडून केली हत्या

 


म्हैसूर येथे इंटेलिजन्स ब्युरोचे सेवानिवृत्त अधिकारी आर के कुलकर्णी यांची अज्ञात कारने हत्या केली. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी, 83 वर्षीय आर के कुलकर्णी  केंद्रीय गुप्तचर विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक हे म्हैसूरच्या मनसा गंगोत्री भागात कारला धडकल्याने मरण पावले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते इव्हनिंग वॉकसाठी जात असताना त्यांना एका आज्ञात  कारने धडक दिली. सुरुवातीला हे हिट अँड रन प्रकरण असल्याचे मानले जात  होते परंतु आता त्याच्या मृत्यूनंतरच्या तपासात त्यांना अज्ञात कारने जाणीवपूर्वक चिरडल्याचे समोर आले आहे.

सुरुवातीला, ही घटना एक हिट अँड-रन घटना असल्याचे मानले जात होते, परंतु घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळवलेल्या CCTV  पुराव्यावरून असे दिसून आले कुलकर्णी यांना कारने जाणीव पूर्वक चिरडले, कुलकर्णी यांना भरधाव कारने धडक देऊन हवेत फेकले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. कारला नंबर प्लेट नव्हती हेही व्हिज्युअल्स वरून दिसून आले. हे केवळ हिट अँड रन प्रकरण नसून पूर्वनियोजित हत्येचे प्रकरण म्हणून पोलीस आता याचा तपास करत आहेत. आतापर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जयलक्ष्मी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की आर के कुलकर्णी 2000 मध्ये सेवानिवृत्त झाले.

म्हैसूरचे पोलिस आयुक्त चंद्रगुप्ता म्हणाले, "आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे की 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता मनसा गंगोत्री येथे एक अपघात झाला जेथे एका 83 वर्षीय व्यक्तीचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला." ते पुढे म्हणाले, “आम्ही त्याची सखोल चौकशी केल्यावर हा अपघात नसून खून आहे, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यानुसार आम्ही आमचा तपास सुरू केला. सहायक पोलिस आयुक्त नरसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली तीन तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. गाडीवर नंबरप्लेट नसल्याचं लक्षात आल्यानंतर आम्हाला संशय आला.या प्रकरणात असे काही लीड्स आहेत जे आम्ही आता उघड करू शकत नाही.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने