बालदिनानिमित्त विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आज सकाळी (14 नोव्हेंबर 2022) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र (आरबीसीसी) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असतो. मुले ही आहेत तशी तशी स्वतःला स्वीकारतात .यामुळेच ती चैतन्यदायी असतात. मुलांची हीच निरागसता आणि पावित्र्य आज पण साजरे करत आहोत, असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या .
प्रत्येक नवीन पिढी नव्या संधी आणि नवीन स्वप्ने घेऊन येते.तंत्रज्ञान आणि हे माहिती क्रांतीचे हे नवे युग आहे. मुले आता विविध देशांतर्गत, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूक आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तंत्रज्ञान आल्यामुळे, आता ज्ञान आणि माहिती त्यांच्या एका बोटावर उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना योग्य मूल्यशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना विविध उपक्रम आणि चर्चांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. मुलांकडूनही आपण खूप काही शिकू शकतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
मोठी स्वप्ने पहा आणि नवीन तसेच विकसित भारताची स्वप्ने पहा असा उपदेश राष्ट्रपतींनी केला. आज पाहिलेली स्वप्ने उद्या सत्यात उतरू शकतात, असे त्या म्हणाल्या. मोठे झाल्यावर कोणत्या प्रकारच्या भारतात राहायचे आहे याचा विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला. परिणामांची चिंता न करता कर्तव्याचा मार्ग अवलंबावा, जो अखेर तुम्हाला मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल असे आवाहन त्यांनी केले. आज मुले जो मार्ग निवडतील तो येत्या काळातला भारताचा प्रवास निश्चित करेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले. मोठे झाल्यावरही आपल्या आतील मूल जिवंत ठेवण्याचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. राष्ट्रपतींनी भारताच्या संस्कृतीची कास धरुन ठेवण्याचे, पालकांचा नेहमी आदर करण्याचे आणि मातृभूमीवर प्रेम करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
टिप्पणी पोस्ट करा