का होतोय Boycott Fukrey 3 ट्रेंड, या आधी देखील रिचा चढ्ढा यांनी पाकिस्तानला दिला होता पाठिंबा

 


बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा सध्या खूप चर्चेत आहे. गलवान घटनेवर तिने  केलेल्या ट्विटमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे रिचा ट्रोल होत असताना दुसरीकडे तिच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रिचा चड्ढाचे काही जुने व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये ती पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर बोलत आहे. अभिनेत्रीचे हे व्हिडिओ शेअर करत सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, रिचा बऱ्याच दिवसांपासून देशाच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने बोलत आहे.

रिचा चढ्ढा हिचा २०१९ सालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिपोर्टर रिचाला विचारतो की एकीकडे पाकिस्तान आमच्या चित्रपटांवर बंदी घालत आहे आणि दुसरीकडे आमचे कलाकार तिथे परफॉर्म करत आहेत. यावर ऋचा म्हणाली, 'याबाबत माझा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. मला वाटतं कलाकार प्रेम, शांततेबद्दल बोलतात. मला वाटतं कलाकारांवर बंदी आहे कारण कलाकार दोघांत मैत्री करू शकतात. दुसर्‍या एका कार्यक्रमात रिचा म्हणताना दिसत आहे, 'जर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांना हाकल्यामुळे, हल्ला होणार नाही असे सांगू शकत असाल, तर त्यांच्यावर बंदी घाला. कोणी याची हमी देईल का?'

सध्या या सर्व गोष्टीमुळे ट्विटरवर बॉयकॉट फुक्रे ३ ट्रेंड होत आहे. रिचा चढ्ढा हिने योग्य प्रकारे माफी मागावी, असे सोशल मीडियावरील यूजर्सचे म्हणणे आहे. रिचा चढ्ढा यांच्याबाबत अनेक मीम व्हायरल होत असुन. रिचा चढ्ढाला खूप ट्रोल केले जात आहे. रिचा चड्ढाच्या या ट्विटला काही सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या लग्नाशीही जोडले आहे. यासोबतच काही सोशल मीडिया यूजर्सनी रिचा चढ्ढा यांच्यासाठी असभ्य शब्दही वापरले आहेत.

रिचाने तिच्या एका ट्विटमध्ये लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. लष्करी अधिकाऱ्याने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहे. ज्यावर ऋचाने लिहिले, 'गलवान हाय (हॅलो) म्हणत आहे.' यानंतर अनेकांनी ट्विटरवर अभिनेत्रीची निंदा केली आणि भारतीय जवानांच्या हौतात्म्याची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. एकीकडे अक्षय कुमारने ट्विटरवर अभिनेत्रींचा क्लास सुरू केला आहे, तर दुसरीकडे दिग्दर्शक अशोक पंडित यांनी तक्रार दाखल केली आहे.

जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा ऋचा चढ्ढा यांनी माफी मागितली आणि म्हणाली, 'माझा हा हेतू अजिबात नव्हता, तरीही ज्या तीन शब्दांवरून वाद निर्माण केला जात आहे, त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते, जर माझ्या शब्दांमुळे माझ्या सैन्यातील बांधवांमध्ये माझ्याबद्दल चुकीची भावना निर्माण झाली असेल तर मला माफ करा. माझे आजोबा देखील सैन्यात होते.' ऋचाने सांगितले की तिचे आजोबा भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते आणि 1965 च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागली होती. अभिनेत्री म्हणाली, 'ते माझ्या रक्तात आहे. देशाची सेवा करताना एखादा मुलगा शहीद झाला किंवा जखमी झाला की त्संयाचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने