Chanakya Niti : या लोकांवर विश्वास ठेवला तर होऊ शकते तुमची नेहमी फसवणूक

 


आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांच्या 'चाणक्य-नीती शास्त्र' मध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आचार्य चाणक्य हे त्यांच्या गुणांनी राजकीय तत्वज्ञानी, नीतिशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेले साहित्य हे समाजाला शांतता, न्याय आणि प्रगती शिकवणारे ज्ञानाचे भांडार आहे. इसवी सन 2500 पूर्वी आचार्य चाणक्यांनी चाणक्य-नीती शास्त्र लिहिले होते, ज्यात लिहिलेली धोरणे आजच्या काळातही अगदी बरोबर आहेत.

'चाणक्य नीति' या पुस्तकानुसार चाणक्य-नीती शास्त्राच्या पहिल्या अध्यायात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, व्यक्तीने कोणावर विश्वास ठेवू नये. आचार्य चाणक्य यांनी विश्वासार्हतेच्या लक्षणांवर चर्चा करताना म्हटले आहे की, “काही लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये कारण ते मारतील, दुखावतील हे सांगता येत नाही, जरी कोणी या लोकांवर विश्वास ठेवला तरी त्या व्यक्तीची नेहमी फसवणूक होते." चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांवर विश्वास ठेवू नये.

"नखीनां च नदीनां च शृंगीणां शस्त्रपाणिनाम् . विश्वासो नैव कर्त्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च ॥15॥"

1. लांब नखे असलेले शिकारी प्राणी

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, लांब नखे असलेल्या सिंह, अस्वल किंवा वाघ इत्यादी शिकारी प्राण्यांवर विश्वास ठेवता येत नाही. कारण तो प्राणी तुम्हाला कधीही फसवू शकतो कधीही तुमच्यावर हल्ला करू शकतो.

2. सशस्त्र माणूस

आचार्य चाणक्य म्हणतात की शस्त्रधारी व्यक्तीवर म्हणजेच ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. कारण तुम्हाला हानी पोहोचवण्याची बाब त्यांच्या मनात कधी येईल माहीत नाही.

3. राजघराण्याशी संबंधित लोक

आचार्य चाणक्य म्हणतात की काही वेळा राजघराण्यातील / राजकारणातील लोक कारण मुत्सद्देगिरीत निष्णात असलेले असे लोक सत्तेत येण्याच्या (सत्ता मिळविण्याच्या लालसेने) काहीही करू शकतात  उदाहरणार्थ, लोभापोटी कंसाने पिता उग्रसेनाला तुरुंगात टाकले होते आणि आपला जीव सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने बहीण देवकीला तिचा पती वासुदेवसह तुरुंगात टाकले होते. त्यामुळे अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका.

4. नद्या

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला नदी ओलांडायची असेल तर नदीचा प्रवाह किंवा खोली किती आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये कारण नदीच्या प्रवाहाची आणि खोलीची अचूक माहिती कोणीही देऊ शकत नाही. आपणच सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःचा विवेक वापरला पाहिजे.

5. शिंगे असलेले प्राणी

आचार्य चाणक्य म्हणतात की शिंगे असलेले प्राणी आणि शस्त्रधारी माणसांवरही विश्वास ठेवता येत नाही. कारण ते तुम्हाला कधी हानी पोहोचवू शकतात किंवा स्वार्थासाठी तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतात. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने