चीनचे (China) अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची युद्धाच्या तयारीची घोषणा

 


जगभर चीन आपल्या विस्तारवादी धोरणासाठी बदनाम आहे. भारताला लडाखमध्ये, गेल्या अडीच वर्षांपासून ते डिवचत आहेत, तैवानवरही चीनने आपला हक्क सांगीताला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन अनेकदा समोरासमोर आले आहेत. त्याचवेळी, आता गेल्या नऊ महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना आणि त्यामुळे संपूर्ण जगात अशांतता असताना, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उघडपणे युद्धाच्या तयारीची घोषणा केली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या वाढत्या अस्थिर आणि अनिश्चित सुरक्षेचा हवाला देत युद्धाच्या तयारीवर भर देणार असल्याचे जाहीर केले आहे. चीनचे अधिकृत माध्यम 'सीसीटीव्ही' नुसार, जिनपिंग यांनी सांगितले आहे की बीजिंग सर्वसमावेशकपणे लष्करी प्रशिक्षण आणि कोणत्याही युद्धाची तयारी मजबूत करेल.

चीनच्या अध्यक्षांच्या या नुकत्याच झालेल्या घोषणेने काही प्रमाणात तैवानला धोका असल्याचेही सांगितले जात आहे. चीन तैवानवर आपला दावा करत आहे. गरज पडल्यास बळजबरीने तैवान चीनला जोडण्याची धमकी चीनने वारंवार दिली आहे. शी जिनपिंग यांचे हे व्यक्तव्य ब्रिटनचे व्यापार मंत्री ग्रेग हँड्स यांच्या यूके-तैवान व्यापार चर्चेसाठी तैवानच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आले आहे. ही भेट यूके-तैवान व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी यूकेच्या वचनबद्धतेचे स्पष्ट संकेत आहे.

ब्रिटनच्या मंत्र्याच्या तैवान भेटीवर चीनने जोरदार आक्षेप घेतला आहे. प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या कोणत्याही देशाने तैवानच्या भूभागाशी अधिकृत देवाणघेवाण करणे हे चीन ठामपणे नाकारतो.” झाओ पुढे म्हणाले की बीजिंगने ब्रिटनला तैवानशी कोणतीही अधिकृत देवाणघेवाण थांबवावी आणि तैवानच्या फुटीरतावादी शक्तींना खोटे संकेत पाठवणे थांबवावे असे आवाहन केले. रशिया आणि युक्रेनमध्ये नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात जगभरातील देश विभागले गेले असताना चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचे हे आलेले वक्तव्य महत्वाचे आहे. रशिया युक्रेनवर दिवसेंदिवस हल्ले वाढवत आहे, या युद्धात युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत चीनच्या या घोषणेनंतर जगभरातील तणाव आणखी वाढू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने