Dev Deepawali 2022 : आज देव दीपावली, जाणून घ्या दीपदानाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

 


देव दीपावली हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. याला त्रिपुरोत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. यावर्षी देव दीपावली आज म्हणजे 7 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारी आहे. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला म्हणून त्या आनंदात हा सण साजरा केला जातो. देव दीपावलीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. देव दीपावलीच्या दिवशी सूर्यास्तानंतर दीपदानही केले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष काळात या दिवशी गंगेत दिवा दान केल्याने शत्रूंचे भय राहत नाही. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि कुटुंबात आनंद टिकून राहतो. देव दीपावलीच्या दिवशी 11, 21, 51 किंवा 101 पिठाचे दिवे बनवा, सर्व देवतेचे स्मरण करून दिव्यावर कुंकुम, हळद आणि फुले अर्पण करा  आणि प्रदोष काळात नदीत दिवे दान करा.

आज पौर्णिमा तिथी 07 नोव्हेंबर रोजी दुपारी 04:15 वाजता सुरू होईल आणि 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 04:31 वाजता समाप्त होईल. देव दीपावलीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:14 ते 07:49 पर्यंत आहे. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटे आहे. उद्या चंद्रग्रहण आल्यामुळे देव दिवाळी आजच साजरी केली जाईल 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने