श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाच्या याच्या व्हॅनवर हल्ला करण्यात आला आहे. एफएसएल कार्यालयाबाहेर आफताबवर हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, आफताबला व्हॅनमधून नेत असताना हा हल्ला झाला. सुमारे 4-5 जणांनी वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आफताबच्या व्हॅनच्या बाहेर दोन तलवारी घेऊन हल्लेखोर आलेले दिसत आहेत. हे हल्लेखोर व्हॅनमधून आले होते. श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.
श्रध्दा खून प्रकरणातील आरोपी आफताब तपासात सहकार्य करण्याऐवजी पोलिसांना सतत गोंधळात टाकत होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्या नार्को आणि पॉलीग्राफी चाचणीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी आफताबची पॉलीग्राफी चाचणीचा चौथा टप्पा होता. पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबला एफएसएलमधून कारागृहात घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लोक तलवारी घेऊन आफताबच्या व्हॅनच्या मागे धावले. एवढेच नाही तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पूर्ण नियोजन करून आले होते. कारमध्ये अनेक शस्त्रे ठेवण्यात आली होती. असे कोणी केले तर आम्ही त्याला सोडणार नाही, असे हल्लेखोरांनी सांगितले. हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 असल्याचं सांगण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा