पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार) इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आठ देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डमच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यामध्ये द्विपक्षीय करारावर सहमती होऊ शकते.
तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियातील बाली येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती जोको विडोडो यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचवेळी पीएम मोदींनी ट्विट करून बालीमध्ये झालेल्या हार्दिक स्वागताबद्दल भारतीय समुदायाचे आभार मानले आहेत. याशिवाय पीएम मोदींनी त्यांच्या बाली दौऱ्याच्या पहिल्या दिवशी G20 शिखर परिषदेत त्यांचे यूके समकक्ष ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यातही भेट झाली. उभय नेत्यांनी मंगळवारी इतर क्षेत्रांसह उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीच्या स्थितीचा आढावा घेतला. दुसऱ्या एका बैठकीत पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशीही चर्चा केली.
बाली शिखर परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवतील. 1 डिसेंबर 2022 पासून भारत अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारेल. 2023 मध्ये भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी G20 सदस्यांना वैयक्तिक निमंत्रण देतील.
टिप्पणी पोस्ट करा