हिमाचलमध्ये (Himachal) कोणाचे सरकार, काय सांगतो विविध सर्वेक्षणाचा अंदाज

 


हिमाचल प्रदेशात मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान आहे. यानंतर त्याचा निकाल  8 डिसेंबर रोजी समजणार आहे. मतदानापूर्वी आलेल्या ‘ओपिनियन पोल’ ने हिमाचलच्या जनतेचा मूड सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विविध सर्वेक्षणात वेगवेगळा अंदाज नोंदवला गेला आहे. एका सर्वेक्षणात भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर बाकीच्या सर्वेक्षणात 37 वर्षांचा विक्रम मोडत सत्ताधारी पक्ष सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. विविध सर्वेक्षणाचा अंदाज काय आहे ते आपण जाणुन घेऊया 

एबीपी न्यूज सी-व्होटरने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात  भाजप आणि काँग्रेसमध्ये टोकाची लढत होऊ शकते. त्यांच्या जनमत चाचण्यांनुसार, 68 सदस्यीय विधानसभेत भाजप 31-39 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेसला 29-37 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला ०-१ जागांवर समाधान मानावे लागेल, तर इतरांच्या खात्यात ०-३ जागा येऊ शकतात. सर्वेक्षणात भाजपला ४५ टक्के तर काँग्रेसला ४४ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'आप'ला ३ टक्के आणि इतरांना ८ टक्के मते मिळू शकतात.

इंडिया टीव्ही-मॅटराइझ सर्वेक्षणात असे म्हटले आहे की भाजप पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करू शकते. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 38-43 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसला 24-29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 1-3 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

झी न्यूज-दर्पणने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप पुन्हा एकदा हिमाचलमध्ये कमळ फुलवू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 5 वर्षांनंतर सरकार बदलण्याच्या जुन्या परंपरेनुसार या वेळेस सत्ता मिळेल या आशेवर असलेल्या काँग्रेसला 26 जागांवर समाधान मानावे लागू शकते. सामना तिरंगी करण्यासाठी उतरलेल्या आम आदमी पक्षाला खातेही उघडता येणार नसल्याचा अंदाज यात व्यक्त केला आहे. इतरांच्या खात्यात 0-2 जागा जाऊ शकतात.

रिपब्लिक भारत आणि पी-मार्कच्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा भाजप सरकारचा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला 37-45 जागा मिळू शकतात. काँग्रेसच्या खात्यात 22-28 जागा जाऊ शकतात. आम आदमी पक्षाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात भाजपला ४५.२ टक्के, काँग्रेसला ४०.१ टक्के, आम आदमी पक्षाला ५.२ टक्के आणि इतरांना ९.५ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचा निकालात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले होते तर इतरांना 3 जागा मिळाल्या. 2012 मध्ये काँग्रेसने 36 जागांसह सत्ता काबीज केली होती आणि भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या व इतरांच्या खात्यात 6 जागा होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने