भारतीय (IAF) आणि फ्रेंच (FASF) हवाई प्रमुख यांचे एकत्रित उड्डाण

 


भारतीय हवाई दल (IAF) आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) यांच्यात सुरू असलेल्या संयुक्त प्रशिक्षण मोहिम Ex Garuda VII मध्ये IAF चे हवाई दल प्रमुख (CAS), एअर चीफ मार्शल VR चौधरी (VR Chaudhari) आणि FASF चे हवाई दल प्रमुख जनरल स्टीफन मिल (General Stéphane Mille) यांनी काल एकत्रित उड्डाण केले CAS यांनी IAF राफेल फायटरमध्ये उड्डाण केले, तर FASF प्रमुखाने IAF Su-30MKI फायटरमध्ये उड्डाण केले. जोधपूर एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण केलेल्या संयुक्त प्रशिक्षण मोहिमेचा भाग म्हणून दोघांनी सरावात भाग घेतला.

नंतर मीडियाशी बोलताना, FASF प्रमुखासह, CAS ने स्पष्ट केले की Ex Garuda दोन्ही हवाई दलांना ऑपरेशन्स दरम्यान एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती शिकण्याची आणि आत्मसात करण्याची अनोखी संधी प्रदान करते. 2003 पासून नियमित सुरु असलेल्या द्विपक्षीय सरावाच्या प्रत्येक आवृत्तीसह विकसित होत असलेल्या दोन्ही हवाई दलांमधील वाढत्या परस्पर कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

Ex Garuda VII यात प्रथमच तेजस आणि अलीकडेच समाविष्ट झालेल्या LCH प्रचंड यांचा सहभाग असुन कोणत्याही आंतरराष्ट्रीय सरावात सहभागी होण्याचा या विमानाचा पहिलाच प्रसंग आहे. 12 नोव्हेंबर 22 रोजी पूर्ण होणार्‍या या सरावात चार FASF राफेल लढाऊ विमाने आणि एक A-330 मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमानाचा समावेश आहे. LCA आणि LCH व्यतिरिक्त, IAF दलात Su-30 MKI, Rafale आणि Jaguar लढाऊ विमाने, तसेच Mi-17 हेलिकॉप्टर आहेत. IAF दलामध्ये फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, AWACS, AEW&C आणि गरुड स्पेशल फोर्सेस सारख्या लढाऊ सक्षम मालमत्तांचा देखील समावेश आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसीध्दी पत्रकाद्वारे दिली आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने