इंडोनेशियामध्ये (Indonesia) सोमवारी भूकंपाचे (Earthquake) मोठ्या प्रमाणात धक्के जाणवले असुन, यात 20 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जण जखमी झाले अशी माहिती मिळत आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रांतात या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बऱ्याच इमारतींचे नुकसान देखील झाले असून लोकांना जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये पळावे लागले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (US Geological Survey) यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जावाच्या सियांजूर भागात (Cianjur region of Java) 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर होते.
भूकंपाच्या धक्क्यांनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. सियांजूर येथील बचाव अधिका-यांनी सांगितले की त्यांनी सियांजूरमध्ये भूस्खलनात अडकलेल्या दोन लोकांना वाचवले, परंतु तिसरा माणूस मरण पावला. "आम्ही एक महिला आणि एका मुलाला जिवंत बाहेर काढण्यात यशस्वी झालो, पण तिसरा माणूस मरण पावला," असे सियांजूरचे पोलीस प्रमुख डॉनी हर्मवान (Donny Hermwan, Cianjur's police chief) यांनी सांगितले.
याआधी इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री समुद्राखाली एक जोरदार भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 इतकी होती. इंडोनेशिया या विशाल द्वीपसमूह राष्ट्रात भूकंप वारंवार होतात, इंडोनेशिया, 270 दशलक्षाहून अधिक लोकांचा विशाल द्वीपसमूह, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी यांनी वारंवार प्रभावित होतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पश्चिम सुमात्रा प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 25 लोक ठार आणि 460 हून अधिक जखमी झाले होते. जानेवारी 2021 मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात 6.2 तीव्रतेचा भूकंप झालाहोता, 100 हून अधिक लोक ठार झाले आणि सुमारे 6,500 जखमी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा