IPL 2023 या पर्वाला लवकरच सुरवात होत असून 23 डिसेंबर रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होणार आहे. मिनी-लिलावापूर्वी, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना आपल्या संघात कायम ठेवलेल्या आणि संघातुन बाहेर केलेल्या खेळाडूंची यादी सार्वजनिक करण्यास सांगितले होते. या अंतर्गत आयपीएलच्या सर्व संघांनी काल या संदर्भातील आपापल्या यादया जाहीर केल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या आणि बाहेर करण्याच्या शेवटच्या तारखेला, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संबंधित याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. IPL 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांनी त्यांच्या संबंधित याद्या जाहीर करून संघ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जाहीर केलेल्या यादीत, KKR ने सर्वाधिक 16 खेळाडूंना बाहेर केले आहे, तर मुंबईने 13 जणांना बाहेरचा रस्खेता दाखवला आहे.
KKR ने पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमक करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम यांच्यासह शेल्डन जॅक्सन अश्या जास्तीत जास्त 16 खेळाडूंना बाहेर केले आहे. तर मुंबई इंडियन्सने अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, फॅबियन अॅलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, बेसिल थम्पी, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, संजय यादव, राहुल बुद्धी आणि टायमल मिल्ससह किरॉन पोलार्ड यांची सुट्टी केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकूर, टिम सेफर्ट, अश्विन हेब्बर, श्रीकर भारत आणि मनदीप सिंग यांना सोडले आहे. तर सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडला T20 विश्वचषक जिंकून देणारा केन विल्यमसन आणि निकोलस पूरन या अनुभवी खेळाडूंना सोडले आहे. राजस्थान रॉयल्सने अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, आर व्हॅन डर डुसेन, शुभम गडवाल आणि तेजस बरोका यांना दुसरीकडे जाण्याची संधी दिली आहे.
आरसीबीने जेसन बेहरेनडॉर्फसह अनिश्वर गौतम, छमा मिलिंद, लवनित सिसोदिया आणि शेरफेन रदरफोर्ड यांना सोडले असुन, लखनौने अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुस्मंथा चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे आणि शाहबाज नदीम यांना सोडले आहे तर गुजरातने रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय आणि वरुण आरोन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना सोडले आहे.
पंजाबने ओडिअन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा आणि हृतिक चॅटर्जी यांच्यासह मयंक अग्रवाल यांना सोडले आहे. तर CSK ने ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ आणि नारायण जगदीसन यांना बाहेर केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा