Lunar Eclipse 2022 : ग्रहण काळात काळजी घ्या, ग्रहण वेध काळात हे काम करणे टाळा

 


उद्या मंगळवार रोजी  खग्रास चंद्रग्रहण असुन जोतिषशास्त्रा नुसार ग्रहणाच्या वेळी काय करावे आणि कोणती कामे टाळावीत हे जाणुन घेणे महत्वाचे आहे, ग्रहणाच्या वेध काळातही काही कामे करणे वर्ज्य आहे. वेध काळ हा ग्रहण काळापेक्षा मोठा असतो. चंद्रग्रहणाचा वेध कालावधी 9 तासांचा असतो जो  ग्रहणाच्या आधी सुरू होतो. उद्या पौर्णिमेला ग्रहणाचा वेध काळ सकाळपासूनच सुरू होईल आणि संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत राहील. या वेध काळामध्ये कोणती कार्य करू नये हे आपण जाणून घेऊया (Be careful during the Lunar eclipse period, avoid to do this work).

खग्रास चंद्रग्रहणाच्या वेधकाळात दान आणि जपदीचे महत्त्व मानले गेले आहे. या काळात पवित्र नद्या किंवा तलावांमध्ये स्नान केले जाते. यावेळी मंत्रांचा उच्चार केला जातो आणि मंत्रसिद्धीही देखील केली जाते. या काळात केलेली तीर्थस्नान, हवन आणि ध्यान इत्यादी शुभ कार्ये लाभदायक ठरतात. धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्या लोकांनी त्यांच्या राशीनुसार किंवा योग्य जोतीष्याचा सल्ला घेऊन दान करावयाच्या वस्तू योग्य व्यक्तीला दृढनिश्चयाने दान द्याव्यात.

,खग्रास चंद्रग्रहणाच्या वेध आणि ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई आहे. यावेळी खाणे, नखे कापणे, अन्न तयार करणे, तेल लावणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्या. तसेच खोटे बोलणे, लबाडी करणे, फालतू बोलणे हे या काळात टाळावे. वेध काळात लहान मुले, वृद्ध, अस्वस्थ महिला इत्यादींना योग्य आहार घेणे वर्ज्य नाही. वेधकाळ सुरू होण्यापूर्वी लोणचे, मुरब्बा, दूध, दही किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकावीत म्हणजे हे अन्नपदार्थ ग्रहणामुळे दूषित होणार नाहीत. घरातील कोरड्या अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकण्याची गरज नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने