आज दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी मंगळवारी, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे . भारतात हे ग्रहण ग्रस्तोदित म्हणजे ग्रहण ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयाला येईल, त्यामुळे भारतात ग्रहण स्पर्श दिसणार नाही. पूर्व भारतात मात्र खग्रास चंद्रग्रहण दिसेल, तर उर्वरित भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. भारतासह पूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका व दक्षिण अमेरिका या देशात ग्रहण दिसेल.
ग्रहणाचा वेध, हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 8 नोव्हेंबर च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:19 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. यात बाल, वृद्ध, अशक्त, आजारी आणि गर्भवती यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी हे या काळात करता येतील. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग देखील या काळात करता येईल.
ग्रहणाचा पर्वकाळ ग्रहण स्पर्श 14:39 वाजता असून त्याचा मध्य 16:30 वाजता राहील तर ग्रहणाचा मोक्ष अर्थात समाप्ती हि 18:19 वाजता होईल, यानंतर सूर्यास्त होतात स्नान करावे. बरेच जणांकडे पौर्णिमेचा कुलधर्म कुलाचार असतो तो कुलाचार ग्रहण समाप्तीनंतर स्नान केल्यावर करता येईल.
टिप्पणी पोस्ट करा