Narendra Modi : गुजरात मधील मोरबी दुर्घटनास्थळी पंतप्रधान मोदींची भेट, घटनेची घेतली सविस्तर माहिती

ब्युरो टीम : गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवार (३० ऑक्टोबर २०२२) रोजी घडली होती.  संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. आज, मंगळवारी (१ नोव्हेंबर २०२२) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

पंतप्रधान मोदी हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. काल, सोमवारी रात्री त्यांनी याप्रकरणी गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत  मोदी यांनी मोरबी दुर्घटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आहे.

#WATCH | PM Modi along with Gujarat CM Bhupendra Patel visits the cable bridge collapse site in Morbi, Gujarat

135 people lost their lives in the tragic incident pic.twitter.com/pXJhV7aqyi
— ANI (@ANI) November 1, 2022

१३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

रविवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी होते. या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेव्हा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचे व्यवस्थापन करण्याऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने