'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) करत आहे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न,' ...या पक्षाचा मोठा आरोप

 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) राज्य सरकार (government of kerala) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) (Communist Party of India -Marxist)  मुख्य सचिव एमव्ही गोविंदन (M V Govindan) यांनी रविवारी केला. एका पत्रकार परिषदेत बोलताना गोविंदन म्हणाले, 'आरएसएस, राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि विद्यापीठांवरील राज्यपालांची (governor) कारवाई हा त्याचाच एक भाग आहे.'

गोविंदन पुढे म्हणाले की, 'राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) बऱ्याच काळापासून पास केलेल्या बिलांना रोखून धरत आहेत आणि त्यामुळे अनिश्चितता निर्माण होत आहे, विविध विधेयकांना रोखून धरणाऱ्या राज्यपालांबद्दल आणि राज्यातील बहुसंख्य कुलगुरूंना (chancellors) काढून टाकण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल सरकारने कायदेशीर मत मागवले आहे.' ते पुढे म्हणाले 'राज्यपालांना फार काळ विधेयके रोखून धरण्याची परवानगी नाही, या अनिश्चिततेशी लढण्यासाठी आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ'

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, 'आमचा पक्ष इतर डाव्या पक्षांसह 15 नोव्हेंबर रोजी राजभवनासमोर भव्य आंदोलन करेल, खासदार तिरुची शिवा या आंदोलनात सहभागी होतील. तसेच पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी 15 नोव्हेंबरला या आंदोलांची सुरवात करतील' तत्पूर्वी, सीपीआय (M) ने 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील नऊ विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या विरोधात तिरुवनंतपुरममधील जनरल पोस्ट ऑफिसवर निषेध मोर्चा काढला.

राज्यपालांनी केरळ विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ, कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, केरळ मत्स्यविद्या आणि महासागर अभ्यास विद्यापीठ, कन्नूर विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठ, संस्कृतचे श्री शंकराचार्य विद्यापीठ, कालिकत विद्यापीठ  आणि थुन्चाथ एझुथाचन मल्याळम विद्यापीठाच्या  कुलगुरूंचा राजीनामा मागितला आहे.

सीपीआय-एमचे CPI-M  राज्य सचिव एमव्ही गोविंदन यांनी या आधी देखील राज्यपाल आरएसएसचे सहानुभूतीदार असल्याचा आरोप केला होता, ते म्हणाले होते, 'राज्यपालांची कायद्यानुसार कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि जर कायदा अवैध असेल तर तेथे कुलपती किंवा राज्यपाल नसतील. हे लाजिरवाणे आहे की राज्यपालांना वाटते आपल्याकडे राजाची शक्ती आहे आणि ते जे काही करत आहेत ते योग्य आहे.' 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने