Shraddha Murder Case : पोलीस मारेकऱ्याला उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये घेऊन जाणार

 


दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब पूनावालाच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता या बाबतचे सर्व पुरावे गोळा करण्याचे सर्वात मोठे आव्हान पोलिसां समोर आहे, गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारेच श्रद्धाच्या मारेकऱ्याला शिक्षा होऊ शकते. आतापर्यंत पोलिसांनी श्रद्धाचा मोबाईल जप्त केलेला नाही, ज्याचा पोलीस सतत शोध घेत आहेत. श्रद्धाचा मोबाईल सापडल्या नंतर अनेक गोष्टी उघड होऊ शकतात.

दुसरीकडे, श्रद्धाच्या हत्येतील आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी त्याच्याकडे पुराव्यांबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक गोंधळात टाकण्यासाठी तो दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, श्रद्धाचा आरोपी मारेकरी आफताब याला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात चौकशीसाठी घेऊन जावे लागेल. मात्र, अद्याप हे कळू शकलेले नाही की पोलीस श्रद्धाच्या मारेकऱ्याला उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये का घेऊन जाणार आहेत? 

उत्तराखंड आणि हिमाचलमधील खुनाशी संबंधित काही छुपे रहस्य आहेत का? किंवा हत्येपूर्वी दोघेही उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये गेले होते, तिथे काहीतरी घडले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त पोलीसच देऊ शकतात. येत्या काही दिवसांत पोलीस मारेकऱ्याला उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये घेऊन जाणार असल्याचे समजते यातून अनेक गुपिते समोर येतील असा अंदाज आहे.

आरोपी खुनी आफताबच्या कोठडीची मुदत वाढवण्यासोबतच नार्को अॅनालिसिस चाचणीची परवानगी मागणारा पोलिसांचा अर्जही न्यायालयाने मंजूर केला आहे. यानंतर आता पोलिसांनी नार्को टेस्टची तयारी सुरू केली आहे. मात्र, आफताबची नार्को टेस्ट कधी होणार हे अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. आरोपी आफताब नार्को टेस्टमध्ये अनेक गुपिते उघड करू शकतो, असे देखील मानले जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने