Shraddha murder case : आफताबची आज पॉलीग्राफी चाचणीची दुसरी फेरी

 


श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी दिल्ली पोलीस आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करत आहेत. तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून, तपासात विसंगत माहिती देत आहे. आज आरोपी आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीची दुसरी फेरी होऊ शकते. कारण काल ​​म्हणजेच गुरुवारी त्याला आलेल्या तापामुळे त्याची संपूर्ण चाचणी होऊ शकली नाही. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)चे पीआरओ संजीव के गुप्ता यांनी सांगितले की, आफताबच्या तापामुळे पॉलीग्राफ चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. आफताबची तब्येत बरी झाल्यास पोलीस त्याला आज त्याला पुन्हा प्रयोगशाळेत आणू शकतात.

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) संचालक दीपा वर्मा यांनी काल सांगितले होते की, आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचे आणखी सत्र होऊ शकते. या पेक्षा अधिक माहिती सार्वजनिक करू शकत नाही. पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबची नार्को चाचणीही केली जाणार आहे. आज तो बरा झाला तर पॉलीग्राफ चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. आफताबची मंगळवारीही पॉलीग्राफी चाचणी झाली. आफताबला ताप आल्याने बुधवारीही ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता डॉक्टर आफताबची बरे होण्याची वाट पाहत आहेत. आफताबची आज पुन्हा चाचणी होऊ शकते, असे मानले जात आहे.

न्यायालयाने आफताबच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली होती. आता शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशा परिस्थितीत शनिवारपूर्वी आफताबची पॉलीग्राफी आणि नार्को टेस्ट व्हावी, अशी दिल्ली पोलिसांना इच्छा आहे. आरोपी आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी अनेक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. पोलिसांना फ्लॅटमधून 5 मोठे चाकू सापडले आहे जे किचन चाकूपेक्षा वेगळे आहेत. जे खूप धारदार असतात, ज्यांची लांबी सुमारे 5-6 इंच असते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने