ब्युरो टीम : पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्याचे आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आज, गुरुवारी (३ नोव्हेंबर २०२२) दक्षिण आफ्रिका विरुद्धची मॅच जिंकावीच लागणार आहे. ही मॅच पाकिस्तान हरल्यास त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. पाकिस्तानच्या टीमला भारत आणि झिम्बावेविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करावा लागला होता. इतकं करूनही त्यांना दोन्ही मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. नेदरलँडविरुद्धच्या मॅचमध्ये मात्र पाकला 92 रनांचे टार्गेट दिले गेले होते. पाकिस्तानच्या टीमने 13.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून मॅच जिंकली होती. पाकिस्तान टीमचा नेट रनरेटही काही विशेष नाही. सेमीफायनलमध्ये धडक मारायची असेल तर पाकिस्तानच्या टीमला दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश या दोन्ही टीम्सना मोठ्या फरकानं पराभूत करावं लागणार आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानी टीमचा कॅप्टन बाबर आझमला आगामी दोन मॅचेसमध्ये कॅप्टन आणि बॅटर म्हणून दुहेरी कामगिरी पार पाडावी लागणार आहे. पाकचा स्टार बॉलर शाहिन आफ्रिदीला आतापर्यंत विकेट घेण्यासाठी झगडावं लागत आहे. टीममधील इतर प्लेअर्ससमोरही त्यांची कामगिरी उंचावण्याचं मोठं आव्हान आहे. तसेच, पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित दोन मॅच जिंकण्यासह ग्रुप-1 मधील इतर टीमच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा