T20 विश्वचषक 2022 मध्ये, आज सिडनी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 9 गडी गमावून 185 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची नऊ षटके संपल्यानंतर पावसामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. त्यानंतर सामना 14 षटकांचा करण्यात आला. यात नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला 142 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य गाठता आले नाही. आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ 33 धावांनी पराभूत झाला.
या आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 9 गडी गमावून 185 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खान (52) आणि इफ्तिखार अहमद (51) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्टजेने अप्रतिम गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अखेरच्या चेंडूवर हरिस रौफच्या रूपाने पाकिस्तानने नववी विकेट गमावली. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला शेवटचा सामना जिंकावा लागेल. त्याच वेळी त्यांना दुवा करावी लागेल की, दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामन्यात नेदरलँडकडून पराभव होऊ दे.
टिप्पणी पोस्ट करा