T20 world cup 2022: भारताने बांगलादेशचा 5 धावांनी केला पराभव

 


T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला (India vs bangladesh ). अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या होत्या. पावसामुळे बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 6 गडी गमावून 145 धावाच करू शकला. गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने 2-2 बळी घेतले. या विजयासह भारत आता 6 गुणांसह गट 1 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारताने दिलेल्या 185 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशाची सुरवात चांगली झाली पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता बांगलादेशाने  60 धावा केल्या. संघाच्या 60 धावांमध्ये लिटन दास एकटा 56 धावा करून खेळत होता त्याचवेळी शांतो 4 धावा करून साथ देत होता यानंतर पावसाच्या व्यतयामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसामुळे बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात बांगलादेशला पहिला धक्का बसला, लिटन दास 27 चेंडूत 60 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दासला राहुलने धावबाद केले. 

भारताकडून 10वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमीने शांतोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शांतो 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. भारतासाठी 12व्या षटकात आलेल्या अर्शदीप सिंगने बांगलादेशला सलग दोन धक्के दिले अर्शदीपने अफिफ हुसैनला वैयक्तिक ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर ने शाकिबला (13) बोल्ड केले. यानंतर गोलंदाजी साठी आलेल्या हार्दिक पांड्याने 13व्या षटकात बांगलादेशला सलग दोन धक्के दिले त्याने यासिर अलीला (1) धावांवर बॅड केले तर मोसाद्देक हुसेनला (6) बोल्ड केले. बांगलादेशचा संघ 6 गडी गमावून 145 धावाच करू शकला. 

याआधी नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला अवघ्या 11 धावांवर पहिला धक्का बसला. संघाचा कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक 2 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माला हसन महमूदने झेलबाद केले. रोहितनंतर विराट कोहली क्रिजवर आला आणि त्याने केएल राहुलला साथ दिली. दोघांनी झटपट धावा केल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 10व्या षटकात केएल राहुल अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने 32 चेंडूत 50 धावा केल्या. राहुलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले.

भारताला 14व्या षटकात तिसरा धक्का बसला. शकीब अल हसनने सूर्यकुमार यादवला क्लीन बोल्ड केले. सूर्याने 30 धावा केल्या. त्याने 16 चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या क्रीजवर आला. पण तो फार काही करू शकला नाही आणि केवळ पाच धावा करून हसन महमूदने त्याला बाद केले. विराट कोहलीने 17 व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. या टी-२० विश्वचषकातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. 

यानंतर दिनेश कार्तिक धावबाद झाला.कार्तिकने पाच चेंडूत सात धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अक्षर पटेल देखील हसन महमूदचा शिकार ठरला अक्षरने 5 चेंडूत 7 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत नाबाद राहिला. कोहलीने 44 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 64 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने तीन तर शकिब अल हसनने दोन बळी घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने