आजचा साखळी गटातील आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. मात्र असे असूनही त्यांचा उपांत्य फेरीतील मार्ग अजून कठीण आहे. T20 विश्वचषक 2022 आता अंतिम टप्यात आला आहे. न्यूझीलंड हा या स्पर्धेतील पहिला संघ आहे ज्याने उपांत्य फेरी प्रवेश निश्चित केला आहे. न्यूझीलंड सुपर-12 च्या पहिल्या गटात आहे. त्याच गटातील इतर दोन संघ ज्यांचे उपांत्य फेरीचे सामने अजूनही शिल्लक आहेत ते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आहेत. दुसऱ्या गटातून आतापर्यंत कोणीही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नसले तरी भारत हा त्याचा प्रबळ दावेदार आहे. याशिवाय पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचाही या शर्यतीत समावेश आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग सध्या कठीण आहे.
ऑस्ट्रेलियाने आपला शेवटचा साखळी सामना जिंकून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी हा विजय त्यांच्यासाठी पुरेसा नव्हता. ऑस्ट्रेलियाचा धावगती अजूनही इंग्लंडपेक्षा कमी आहे. यात सुधारणा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत 106 धावांवर रोखण्याची गरज होती. पण ऑस्ट्रेलियाला आज अवघ्या 4 धावांनी विजय मिळवता आला. अशा स्थितीत या विजयाने ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत कायम ठेवले असले तरी उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांच्याकडे दोनच मार्ग आहेत. पहिला श्रीलंकेने इंग्लंडचा पराभव करणे किंवा पावसामुळे हा सामना रद्द होणे. असे झाले तरच ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठेल.
ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी इंग्लंडला केवळ एका विजयाची गरज आहे उपांत्य फेरीत जाण्यासाठी इंग्लंडला रनरेटची चिंता नाही. अशा परिस्थितीत जर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होणार असून, गेल्या वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया यंदाच्या T20 विश्वचषकातुन बाहेर पडेल.
टिप्पणी पोस्ट करा