T20 World Cup 2022 : इंग्लंड दुसऱ्यांदा टी-२० चॅम्पियन बनला

 


T20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट राखून  पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडच्या सरळ गोलंदाजीसमोर पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे विखुरलेली दिसत होती. या संघाकडून कोणतीही मोठी भागीदारी झाली नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे बाबर आझमच्या संघाने 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या.

इंग्लंडने आपल्या डावाची सुरवात थोडी हळू झाली सुरवातीलाच धोकादायक सलामीवीर अॅलेक्स हेल्स एका धावेवर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर आलेल्या फिलिप सॉल्टने 10 धावांची खेळी खेळली हॅरिस रौफने त्याला झेलबाद केले. तिसऱ्या विकेटच्या रूपाने इंग्लंडला जोस बटलरच्या रूपाने मोठा धक्का बसला. त्याला रिजवानच्या हातून रौफने झेलबाद केले. बटलरने 26 धावा केल्या.

यानंतर आलेल्या स्टोक्स आणि ब्रूक यांनी चौथ्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या पण 20 च्या वैयक्तिक धावसंख्येवर ब्रुक शादाब खानाचा बळी ठरला. त्याचा झेल शाहीन आफ्रिदीने टिपला.यानंतर मात्र स्टोक्स आणि अलीने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर जोरदार फटके मारत 48 धावांची भागेदारी केले अलीने  ने 19 चेंडूत 13 धाव केल्या यानंतर आलेल्या लेव्हन्सटंग ने 1 चेंडूत 1 डाव केली तर  सामान्याचा शिल्पकार ठरलेल्या स्टोक्स ने 52 चेंडूत 49 धावा  केल्या व T20 विश्वचषक 2022 च्या ट्रॉफी वर आपले नाव कोरले.   

सुरवातीला फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरवात चांगली झाली नाही मो. रिझवानने 15 धावा केल्या, पण सॅम कुरनचा एक चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या काठाला लागून विकेटला लागला आणि तो बोल्ड झाला. मो. हारिसला आदिल रशीदने 8 धावांवर बेन स्टोक्सच्या हाती झेलबाद केले. कर्णधार बाबर आझमने 28 चेंडूत 32 धावा केल्या आणि आदिल रशीदने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. इफ्तिखार अहमदला खातेही उघडता आले नाही आणि तो बेन स्टोक्सकरवी झेलबाद झाला.

चांगली फलंदाजी करणाऱ्या शान मसूदला त्याच्या चेंडूवर सॅम कुरनने बाद केले. त्याने 28 चेंडूत 38 धावा केल्या. शादाब खानने 20 धावांची खेळी खेळली आणि त्याला ख्रिस जॉर्डनने बाद केले. मो. नवाज 5 धावा तर मोहम्मद. वसीम 4 धावा करून बाद झाला तर शाहीन आफ्रिदी 5 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून सॅम कुरनने तीन, आदिल रशीद आणि जॉर्डनने प्रत्येकी दोन तर बेन स्टोक्सने एक विकेट घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने