T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेचा पराभव तर भारत व पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश

 


T20 विश्वचषकातील आजच्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. यासह आफ्रिकेचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला असुन भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात पाकिस्ताने  बांगलादेशला पराभूत करून आपले सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे .

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 20 षटकांत 4 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 145 धावा करू शकला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीफन आणि मॅक्स यांनी नेदरलँड्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. त्याचवेळी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने सतत त्यांच्या विकेट्स गमावल्या, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

नेदरलँडचा हा दक्षिण आफ्रिकेवरील क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला विजय ठरला. त्याचवेळी, नेदरलँड्सचा साखळी सामन्यातील हा दुसरा विजय आहे, या आधी त्यांनी झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्या सामन्यात  प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 117 धावा केल्या होत्या तर नेदरलँडने 18 षटकांत 5 विकेट गमावत 120 धावा करून सामना जिंकला होता, मॅक्स ओडने 52 धावा केल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने