T20 World Cup 2022 : मेलबर्नमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे

 


T20 विश्वचषक 2022 मध्ये, टीम इंडियाचा  सुपर-12 मधील  शेवटचा सामना आज  झिम्बाब्वे यांच्या विरुद्ध होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरू होईल. टीम इंडिया आता उपांत्य फेरीत पोहोचली असून या सामन्यात विजय मिळवून संघ ग्रुप मध्ये सर्वात वरती राहण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण या संघाने पाकिस्तानसारख्या संघालाही पराभूत केले आहे, त्यामुळे भारतीय संघ झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ इच्छित नाही.

भारतीय संघ गट २ मधून T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या स्पर्धेत भारताने चारपैकी तीन सामने जिंकले आणि एकात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडिया आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेशी भिडणार आहे. त्याचबरोबर या विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव करून सर्वांनाच धक्का दिला होता. झिम्बाब्वे संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी टीम इंडियाला झिम्बाब्वेला हलक्यात घ्यायला आवडणार नाही.

भारत संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

झिम्बाब्वे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (सी), रेगिस चकाबवा (wk), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नगारवा, ब्रॅड इव्हान्स, ब्लेसिंग मुजबानी

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने