T20 World Cup: पावसामुळे भारत-बांगलादेश सामन्यात होऊ शकते गडबड

 


T20 विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील महत्त्वाचा सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच वेळी हा सामना गमावणे किंवा रद्द होणे हे भारतासाठी पुढील वाटचाल  कठीण करू शकते. अॅडलेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाची नोंद होत असली तरी आज सकाळपासून पाऊस झालेला नाही. मात्र,थंडी वाढली आहे. परंतु अंदाजानुसार आज हवामान निरभ्र राहणार असून सध्यातरी पावसाची शक्यता नाही. भारत आणि बांगलादेशसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील, तर पराभूत झालेल्या संघाला पुढील फेरी गाठणे कठीण होईल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अॅडलेडमध्ये आज दुपारी 3 ते (ऑस्ट्रेलियन वेळ) आणि संध्याकाळी 5 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पावसाची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियन वेळेनुसार भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून होणार आहे. अशा स्थितीत सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळू शकतो.

भारतासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, कारण भारताचा पुढील सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झिम्बाब्वेविरुद्ध आहे. मेलबर्नमध्ये यापूर्वीच तीन सामने पावसाने धुवून टाकले आहेत, तर एक सामन्यात पावसाने सतत व्यत्यय आणला आहे. जर भारताने हा सामना जिंकला नाही तर भारताची डोकेदुखी वाढणार हे नक्की.

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.

संभाव्य बांगलादेश संघ

नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मोसाद्दिक हुसेन, नुरुल हसन, यासिर अली, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद आणि तस्किन अहमद.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने