T20 world cup : उपांत्य सामन्यात इंग्लंडचा भारतावर सहज विजय

 


T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळला गेला. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या  मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर सहज विजय मिळवला भारताची गोलंदाजी हि समस्या आज ठळकपणे दिसून आली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने कोहली आणि हार्दिक पंड्याच्या यांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडसमोर 169 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. 

इंग्लंडने 169 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरवात केली त्यांनी पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई केली पॉवरप्लेमध्ये भारतीय संघ केवळ 38 धावा करू शकला आणि एक विकेट गमावली होती.  पण इंग्लंडने 6 षटकांत एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. अक्षरने 2 षटकात 19 धावा आणि भुवीने दोन षटकात 25 धावा दिल्या.

यानंतर एकाही भारतीय गोलंदाजाला एकही विकेट घेण्याची संधी साधता आली नाही. इंग्लंडच्या सलामीवीरांनी कोणतीही मोठी जोखीम न घेता प्रत्येक षटकात चौकार मारला, त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दबाव आला. सलामीवीर बटलरनंतर हेल्सही मोठे फटके खेळत होता. त्यांनी त्यांच्या संघाला एकही विकेट न गमावता 16 व्या षटकात इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या तर हेल्स ने 47 चेंडूत  86 धावा केल्या आता फायनल मध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होईल 

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा सलामीवीर केएल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. षटकातील चौथ्या चेंडूवर ख्रिस वोक्सने केएल राहुलला बाद केले. राहुलने यष्टिरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद केले. त्याने पाच चेंडूंत पाच धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर भारतावर दबाव होता. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव पुढे नेला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या.

पण शर्मा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. तेव्हा ख्रिस जॉर्डनने इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहितला सॅम करणने झेलबाद केले. त्याने 27 चेंडूत 28 धावा केल्या. यादरम्यान भारतीय कर्णधाराने चार चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर आला.

या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या सूर्यकुमार यादवने या सामन्यात आपली कमाल दाखवू शकला नाही. आदिल रशीदचा खराब चेंडू सूर्यकुमारने उंचावला आणि तो झेलबाद झाला. सूर्यकुमार 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या कोहलीने डाव सावरला. कोहलीने अर्धशतक झळकावून आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील चार हजार धावा पूर्ण केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत 61 धावा जोडल्या.

मात्र त्यानंतर भारताला चौथा धक्का बसला. 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. ख्रिस जॉर्डनने त्याला आदिल रशीदकरवी झेलबाद केले. कोहलीने 40 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी पांड्यानेही 31 चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. भारताने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 168 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने दोन, आदिल रशीद आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने