T20 WorldCup : फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलँड आणि पाकिस्तान (PAK vs NZ ) यांच्यात आज लढत

 


T20 विश्वचषक 2022 (T20 WorldCup) च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या(First Semifinal) सामन्यात आज (9 नोव्हेंबर) न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी (PAK vs NZ )होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही संघांमधील हा शानदार सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचेल. तर दुसरीकडे, न्यूझीलंडचे लक्ष्य दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळवण्याचे असेल.

जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, पाकिस्तानचा संघ वरचढ दिसतो कारण त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 28 टी20 पैकी 17 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. असे असूनही न्यूझीलंड संघाला अजिबात कमी लेखता येणार नाही कारण तो पाकिस्तानपेक्षा शिस्तबद्ध संघ असल्याचे दिसते. आतापर्यंत न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत सुपर12 मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. तर दुसरीकडे, नशिबाने पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे.

भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान संघाच्या टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात चांगली झाली नाही, त्यानंतर नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तानने पुनरागमन केले, परंतु उपांत्य फेरीतील त्यांचा मार्ग इतर संघांच्या निकालांवर अवलंबून होता. पुढे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यावर पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. नंतर त्यांनी बांगलादेशचा पराभव करून अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला फॉर्मात नसलेला कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल. संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद आणि शादाब खान या खेळाडूंचा फॉर्म चांगला आहे, त्यांच्या बॅटने सध्या धावा होत आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर वेगवान शाहीन आफ्रिदीही लयीत परतला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ फॉर्मात असलेल्या ग्लेन फिलिप्सवर अवलंबून असेल, तर कर्णधार केन विल्यमसनलाही पुन्हा एकदा मोठी खेळी खेळायची अपेक्षा असेल. मधल्या फळीत डॅरिल मिचेल आणि जेम्स नीशम, तर ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर हे गोलंदाजीत प्रमुख भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

न्यूझीलंड संभावित संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलेन .

पाकिस्तान संभावित संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने