Twitter Blue Tick : 'ट्विटर ब्‍लू टिक' साठी भारतीयांना द्यावी लागणार महिन्याला 'ही' रक्कम!


ब्युरो टीम
: एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर ट्विटर मध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता ट्विटर ब्लू टिकसाठी त्यांनी पैसे घेण्यास सुरुवात केली आहे.

मस्क यांनी ट्विटरच्या पॉलिसीत बदल करायला सुरुवात केली आहे. 'ट्विटर ब्‍लू टिक' साठी आता महिन्याला पैसे घेतले जाणार आहेत. मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, 'ट्विटर प्लॅटफॉर्मला फ्री चालवले जाणार नाही. ट्विटर ब्लू टिकसाठी दर महिना ८ डॉलर म्हणजचे जवळपास ६६० रुपये वसूल केले जाणार आहेत. प्रत्येक देशात ट्विटर ब्लू टिकचा चार्ज वेगवेगळा असणार आहे.

कोणत्या देशात किती चार्ज वसूल करायचा आहे ? हे त्या देशाच्या खरेदी पॉवरवर अवलंबून असेल. भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी ६६० रुपये महिन्याला पैसे द्यावा लागणार आहे. ,तसेचट्विटर ब्लू टिक देण्याची सध्याची सिस्टम व्यवस्थित नाही, असेही  मस्क यांनी एका ट्विट मध्ये म्हटले आहे.

'पेड ब्लू टिक यूजर्सला रिप्लाय, सर्च आणि मेंशन मध्ये प्राथमिकता दिली जाईल. याशिवाय, ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडियो पोस्ट केले जावू शकतील. ट्विटर ब्लू टिक यूजर्सला आधीच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील,' असेही एलन मस्क यांनी म्हंटल आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने