ट्विटरची (Twitter) ब्लू टिकसह मासिक सदस्यता योजना सुरू

 


ट्विटरने (Twitter) ब्लू टिकसह मासिक सदस्यता योजना सुरू केली आहे. ही मासिक सदस्यता सध्या यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्ये सुरू झाली आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत बदल करत आहेत. ट्विटर कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर  ट्विटरने ब्लू टिक मासिक सदस्यता योजना सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मासिक सबस्क्रिप्शन प्लान सध्या फक्त iOS यूजर्ससाठी सुरू करण्यात आला आहे. ब्लू टिकसह मासिक सदस्यता योजना घेतल्यास, ट्विटर वापरकर्त्यांना अनेक नवीन आणि अधिक वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल.

या आधी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी शनिवारी एक ट्विट करून कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहले आहे कि, "मला जाणवले की बरेच लोक माझ्यावर नाराज आहेत. प्रत्येकजण या स्थितीत आहे याला मी जबाबदार आहे. मी कंपनी इतक्या वेगाने वाढवली, मी त्याबद्दल माफी मागतो. ट्विटरवर काम केलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे."

ट्विटर ब्लू टिकसह मासिक सदस्यता भारतात कधी सुरू करेल ?  या प्रश्नाचे उत्तर देताना, एलोन मस्क यांनी स्वतः ट्विट करून सांगितले की "आशा आहे, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हे सुरु होईल" एलोन मस्क यांनी हे उत्तर @Cricprabhu  या एका वापरकर्त्याला दिले आहे. याचा अर्थ असा की लवकरच ब्लू टिक मासिक सदस्यता योजना भारतातही सुरू होईल. परंतु भारतात यासाठी किती किंमत निश्चित केली जाते व त्यावर जीएसटी लागू होईल की नाही हे पाहणे  महत्वाचे ठरेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने