Zero Covid : China मधील नागरिक म्हणतात 'जिम्मी जिम्मी आजा आजा', बॉलिवूडचे हे गाणं आले चर्चेत

ब्युरो टीम : १९८२ साली आलेल्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'जिम्मी जिम्मी आजा आजा' हे तुह्माला आठवत आहे का?  हे गाणं बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांनी गायलं आहे. सध्या मात्र हे गाणं चीनमध्ये जोरदार चर्चेत आहे. चीनच्या नागरिकांनी बॉलिवूडच्या या गाण्यातून आंदोलन करण्याचा भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. या गाण्याच्या माध्यमातून नागरिक चीन  सरकारच्या 'झिरो कोविड' पॉलिसीमुळं निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत सरकारला धारेवर धरत आहेत. दरम्यान, चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीमुळं शांघाईसह डझनभर शहरातील लोक आपल्या घरात कैद झाले आहेत.

जगभरात करोना संसर्ग आता नियंत्रणात आला असताना चीनमध्ये मात्र परिस्थिती गंभीर होत चालली आहे. चीनमध्ये करोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना सरकार झीरो कोविड पॉलिसीअंतर्गंत बिजिंगमधील काही परिसरात सातत्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. मात्र, सरकारच्या या झिरो कोविड पॉलिसीमुळं हैराण झाले आहेत. नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलनकर्ते बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांच्या  गाण्याचा वापर करत आहेत.

Pepole in #China trapped their homes due to lockdown hav turned to hav turned to #BappiLahiri super hit song,"Jimmy Jimmy Aja Aja"to convey their frustration over Xi strict #ZeroCovid policy

In mandarin"Jie MI Jie Mi'--"Give Me Rice,Give Me Rice"while showing empty vessels pic.twitter.com/bdYBqrgf0d
— Weisel🇮🇳 (@weiselaqua) November 1, 2022

मराठीत अर्थ....भात द्या भात द्या

चीनमधील सोशल मीडिया साइट 'दोयूयिनवर' हे गाणं मंडारीन भाषेत गायलं जात आहे. 'जिमी जिमी' या गाण्याचा जर मराठीत अनुवाद केल्यास मला भात द्या, मला भात द्या, असा होतो. या व्हिडिओत लोकं रिकामी ताटं घेऊन आंदोलन करत आहेत. म्हणजेच, लॉकडाऊनच्या काळात अन्नाचा तुटवडा होत असल्याची तक्रार यावेळी आंदोलकांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने