Acid Attack : धक्कादायक! दिल्लीत दिवसाढवळ्या १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला



ब्युरो टीम : दिल्लीत एका १७ वर्षीय मुलीवर दिवसाढवळ्या अॅसिड हल्ला  केल्याचा धक्कादायक प्रकार घडला  आहे. द्वारका परिसरात ही दुर्घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपींनी मुलीवर अॅसिड फेकलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

दरम्यान, मुलीची प्रकृती गंभीर असून तिचा सर्व चेहरा भाजला आहे. तिच्या डोळ्यातही अॅसिड गेल्याचे माहिती आहे.  मुलीने दोन आरोपींची ओळख पटवली असून, एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



नेमकं काय घडलं ?

सीसीटीव्हीत मुलगी रस्त्यावरुन चालत असताना शेजारुन जाणारी एक दुचाकी आपला वेग कमी करते आणि यानंतर एक आरोपी तिच्यावर अॅसिड फेकतो. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मुलगी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून पळताना दिसत आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने