Adar Poonawalla : करोना रुग्णवाढीवर आदर पुनावाला म्हणाले, घाबरू नका...

 


ब्युरो टीम : कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने  (Covid-19) डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. चीनशिवाय अर्जेंटिना, ब्राझील, जपान या देशात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळेच भारतात देखील काळजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला यांनी यासंबंधी ट्विट करीत महत्वाचं मत मांडले आहे.

अदार पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे.'

दरम्यान, जगभरात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने भारतामध्येही केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली आहे. या शिवाय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ट्रॅक करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत की त्यांनी करोना पॉझिटिव्हचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवावेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात मंगळवारी सर्व राज्यांना पत्र लिहले आहे. देशात पसरणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरिएंटची आधीच माहिती मिळू शकते. त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आज होणाऱ्या बैठकीनंतर भारतात काही प्रमाणात करोना निर्बंध लागू होऊ शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने