Ahmednagar : नगरच्या राजकारणात ऑडियो बॉम्ब, क्लिप व्हायरल झाल्याने उडाली खळबळ



ब्युरो टीम : नगरमध्ये एका माजी मंत्र्याने माजी खासदाराच्या मुलाला धमकी दिल्यामुळे व त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्याभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये बॅकग्राऊंडला  दोन इतरही आवाज येत आहेत. हे दोन्ही आवाज नगर जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या आवाजाशी मिळते जुळते असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

क्लिप मध्ये नेमकं काय ?

माजी खासदाराच्या मुलाने संबंधित माजी मंत्र्याच्या गावातील एका विरोधकाला बळ देण्याचे काम सुरू केले. याचाच राग मनामध्ये धरून माजी मंत्र्याने थेट या माजी खासदारांच्या मुलाला धारेवर धरत जर आमच्या गावांमध्ये लक्ष घातले, व त्या कुटुंबाला बळ दिले, तर तुझ्याकडे बघून घेईल, याद राख गाठ माझ्याशी आहे, असा दम सुद्धा भरला आहे. राजकारण गेले तेल लावत, आह्मी केसला काही भीत नाही, असे म्हणत चांगला दम भरला. या दोघांच्या संवादाची  ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


भाजपचे ते ज्येष्ठ नेते कोण?


दरम्यान, त्यामुळे आता हे आवाज नेमके कोणत्या बड्या नेत्यांचे आहेत? यावर जोरदार चर्चा सुरू झाली असून हे बडे नेते सुद्धा संबंधित माजी मंत्र्याला घाबरतात की काय? असेही बोलले जाऊ लागले आहे.


....

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने