ब्युरो टीम : फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना आज रात्री खेळवला जात आहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला सुरु आहे. निर्धारित वेळ आणि दुखापतीच्या वेळेनंतरही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील हा अंतिम सामना २-२ असा बरोबरीत राहिला. आता सामन्यातील विजय-पराजयाचा निर्णय अतिरिक्त वेळेत होणार आहे. येथेही सामना बरोबरीत राहिला तर त्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटवर लागेल
आजच्या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक झाला. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसले. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर होता. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. मात्र, उत्तरार्धात एमबाप्पेने सलग दोन गोल केले, व फ्रान्सचे सामन्यात शानदार पुनरागमन झाले.
टिप्पणी पोस्ट करा