Belgaum Voilence : फडणवीसांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, कारणही तितकच गंभीर



ब्युरो टीम : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरु असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मंगळवारी कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केले. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केला.

यावेळी फडणवीस यांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गनिमी काव्याने बेळगावमध्ये शिरतील, या भीतीने कर्नाटक सरकारकडून सीमारेषेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यांवर दोन हजार पोलीस तळ ठोकून आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने