Bernard Arnault : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट बाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?



ब्युरो टीम : फोर्ब्सच्या यादीत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यादीत त्यांनी टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना मागे टाकले. त्यामुळे मस्क यांनी आता मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान गमावला आहे. 

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकून सप्टेंबर २०२१ पासून मस्क यांनी सातत्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान कायम ठेवले होते. एका अहवालानुसार, त्यावेळी मस्कची संपत्ती १८८ अब्ज डॉलर होती, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या बेझोसची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर होती. दरम्यान, सध्या बेझोस यांची एकूण संपत्ती ११३.८ अब्ज डॉलर असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. दुसरीकडे बर्नार्ड अर्नॉल्ट डिसेंबर २०१९, जानेवारी २०२० आणि मे २०२१ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या बनले होते,  परंतु काही काळानंतर त्यांनी हा मान गमावला. 

मात्र आता पुन्हा एकदा फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ते जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनी, LVMH Moët Hennessy चे सीईओ आहेत. फोर्ब्सच्या नव्या अहवालानुसार बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती १८६.२ अब्ज डॉलरची आहे. त्याच वेळी, एलन मस्कच्या एकूण वैयक्तिक संपत्तीबद्दल बोलायचे तर ते १८५.७ अब्ज इतकी राहिली आहे. मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने