coronavirus update : नाताळ, नव्या वर्षाच्या पार्ट्या होणार का? IIT कानपूरनं केला मोठा दावा



ब्युरो टीम : नवीन वर्ष २०२३ सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नाताळ व नव वर्षाच्या निमित्तानं विविध पार्ट्यांचे आयोजनही करण्यात आले आहे. पण दुसरीकडे चीनमध्ये करोनानं थैमान घातलं आहे. करोनाचा नवा व्हेरिएट BF-7 मुळे जगभरातील अनेक देशात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात देखील या व्हेरिएटचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाताळ व नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्या निर्बंधमुक्त होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. अशातच आयआयटी कानपूर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 'नवभारत टाइम्स' ने याबाबत वृत्त दिलंय.

करोना संदर्भात यापूर्वी अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी कानपूरनं नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. आयआयटीमधील प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ९८ टक्के लोकांची कोव्हिडविरुद्धची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली आहे. काही लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमकूवत असेल आणि एखादी छोटी किंवा मोठी लाट येईल. या शिवाय भारतात फार काही काळजी करण्यासारखे कारण नाही. इतकच नाही तर सध्या बुस्टर डोस किंवा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्या, लग्न समारंभ यावर बंदी घालण्याची गरज नाही. करोनाची लस फक्त शॉर्ट टर्म सुरक्षा देते. पण भारतात याची देखील गरज नाही. नाताळ आणि नव्या वर्षानिमित्त होणाऱ्या पार्ट्या सुरू ठेवण्यात काहीच अडचण नाही. 

दरम्यान, मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता करोनाला वेळीच थोपण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं सरकारनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने