coronavirus update : चीनमध्ये करोनाचा थैमान!, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भरेल धडकी...



ब्युरो टीम: चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं चीनमधील आरोग्य यंत्रणा कमी पडू लागलीय. रुग्णालयाच्या आत आणि बाहेर रुग्णांच्या रांगा लागल्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे इतर देशही सतर्क झाले असून त्यांनीही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

चीनच्या चोंगकिंग शहरातील रुग्णालयातील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. @iPaulCanada नावाच्या ट्विट अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चोंगकिंगमधील रुग्णालयात भीषण परिस्थिती आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात रुग्ण फरशीवर झोपले आहेत. सर्व बेडवर रुग्ण असल्यानं अनेकांना खाली झोपावं लागलं आहे. फरशीवर झोपलेल्या रुग्णांना डॉक्टर सीपीआर देत आहेत. रुग्ण व्हेटिंलीटर असल्याचं आणि डॉक्टर शक्य होईल तितके उपचार त्यांच्यावर करत आहेत.


https://twitter.com/iPaulCanada/status/1605155786245677056?s=20&t=840tiWSZkZTX_ZV_v6M9cQ

दरम्यान, चीनने २०२० पासून देशात कडक निर्बंधांचा भाग म्हणून ‘शून्य कोविड’ धोरण स्वीकारलं आहे. पण लोकांची वाढती नाराजी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने सरकारने डिसेंबरच्या सुरुवातीला सूचना न देता अनेक निर्बंध शिथील केले होते. पण यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने