coronavirus : देशात पुन्हा मास्क सक्ती? वाचा आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं

 


ब्युरो टीम : चीन, जपान आणि अमेरिकेत करोनाचा विळखा वाढतो आहे. त्यामुळे भारतानेही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी  एक आढावा बैठक घेतली, या बैठकीत देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मास्क लावणं आवश्यक असल्याची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर सर्वांनी सतर्क राहावं, अशाही सूचना दिल्या आहेत. त्यावरून देशात पुन्हा मास्क सक्ती होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मनसुख मांडवीय यांनी आज झालेल्या बैठकीची माहिती ट्विट करून दिली आहे.मांडवीय यांनी असं म्हटलं आहे की, 'जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संपलेला नाही, आम्ही सर्वांना सतर्क राहण्यच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत.' याशिवाय, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना रूग्ण वाढले आहेत, त्याबाबत खबरदारी घेण्याचे राज्यांना निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्र सरकारने आवाहन केले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहनही करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने