Coronavirus : चिंता वाढली! भारतात करोनाच्या नव्या व्हेरियंटचे तीन रुग्ण, आज मोदींच्या उपस्थितीत होणार बैठक



 ब्युरो टीम : चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओडिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले असून यासंदर्भात आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत.

चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. दरम्यान पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, दुसरीकडे देशात सध्या करोनाचे ३,४०८ रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने