Covid Cases : धोक्याची घंटा! तो परत येतोय?



ब्युरो टीम : चीनसह जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनशिवाय अर्जेंटिना, ब्राझील, जपान या देशात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळेच भारतात देखील काळजी व्यक्त केली जात आहे.

चीनमधील करोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. चीनसह जगभरातील अनेक देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील काळजी व्यक्त केली जात आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली आहे. या शिवाय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ट्रॅक करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत की त्यांनी करोना पॉझिटिव्हचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवावेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात मंगळवारी सर्व राज्यांना पत्र लिहले आहे. देशात पसरणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरिएंटची आधीच माहिती मिळू शकते. त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आज होणाऱ्या बैठकीनंतर भारतात काही प्रमाणात करोना निर्बंध लागू होऊ शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने